Friday , September 13 2024
Breaking News

सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ

Spread the love

 

कोलकाता :  आयपीएल २०२४ मधील सामना ४७वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ९ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात कोलकाताना फिलीप सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६.३ षटकांत ३ गडी गमावून १५७ धावा करत एकतर्फी विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात आता १२ गुण आहेत. त्याच वेळी, त्यांचा नेट रन रेच १.०९६ झाला आहे, तर दिल्ली या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

फिलीप सॉल्टने खेळली वादळी खेळी
दिल्ली कॅपिटल्सच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहज विजय मिळवला. कोलकाता संघासाठी फिल सॉल्ट आणि सुनील नरेनने पहिल्या विकेट्ससाठी ७९ धावांची भागीदारी केली. फिलीप सॉल्टने स्फोटक कामगिरी केली. सॉल्टने ३३ चेंडूंचा सामना करत ६८ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ३३ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने नाबाद २६ धावा केल्या. दिल्लीसाठी अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल केली. त्याने २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर विल्यम्सने १ विकेट घेतली.

दिल्लीसाठी कुलदीप यादवने केल्या सर्वाधिक धावा
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी या सामन्यात संघर्ष करताना दिसली. पॉवरप्लेमध्ये संघाने तीन गडी गमावले. शॉ १३ धावा केल्यानंतर, मॅकगर्क १२ धावा करून आणि होप सहा धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात दिल्लीने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला बाद केले. त्याला १५ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये २५ धावांची भागीदारी झाली, जी वरुण चक्रवर्तीने संपुष्टात आणली.

त्याने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो २० चेंडूत २७ धावा करून परतला. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ खेळपटीवर टिकू शकला नाही. अवघ्या चार धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने १५ धावा, कुमार कुशाग्रने एक धाव, रसिक सलामने आठ धावा, कुलदीप यादवने ३५ धावा आणि लिझादने एक धावा केल्या. कुलदीप आणि लिझाड नाबाद राहिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने तीन तर वैभव आणि हर्षीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *