Wednesday , July 15 2026
Breaking News

पाच‌ वर्षांत मित्रांना ३ हजार रोपांची भेट निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; वृक्षप्रेम वाढविण्याचा घेतला वसा

Spread the love

 

जागतिक पर्यावरण दिनविशेष

निपाणी (विनायक पाटील) : वाढदिवस, विवाह, वास्तूशांती, स्मृतिदिन, रक्षा विसर्जन अशा विविध प्रकारचच्या निमित्ताने इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा देशी वृक्षाचे रोपटी भेट देऊन वृक्षप्रेम वाढविण्याचा वसा येथील गायत्री नगरातील पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी जपला आहे. ५ वर्षांत त्यांनी ३ हजार रोपे मित्र परिवार व नातेवाइकांना भेट दिली आहेत. शिवाय निपाणी सह परिसरात असलेल्या रिकाम्या जागेवर भूमी वात्सल्य संघटनेतर्फे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करीत आहेत. त्यांनी वृक्षप्रेम वाढविण्याचा घेतलेला वसा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
येथील निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले हे गेल्या पाच वर्षापासून देशी वृक्ष लागवड वाढविण्यासाठी विविध गावांमध्ये वृक्षारोपण करीत आहेत. वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, करंज, आंबा, चिकू, चिंच,आवळा वनौषधी रोपे असे देशी वृक्ष नातेवाईक व मित्रांच्या वास्तुशांती, वाढदिवस, विवाह किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात ते रोपटी भेट देत आहेत.
लग्नकार्यात संबंधितांना देशी वृक्षाबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी भेटवस्तू म्हणून देशी रोपटी व फळांची झाडे भेट देऊन ती जपण्यासही सांगत आहेत. त्यांनी आजवर अनेक मित्रांसह शाळा, मंदिर, स्मशानभूमी, युवक मंडळ, गणेश मंडळांना जांभूळ, केशर, आंबा, चिक्कू, सीताफळ, पेरू आदी फळांची रोपे दिली आहेत. बऱ्याच ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात त्यांनी पर्यावरणाबाबत जनजागृती सुरू केली आहे. या उपक्रमात त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले यांचीही मोलाची साथ मिळत आहे. शहरापासून जवळच असलेल्या अर्जुनी येथे देवराई उद्यानात शेकडो रोपे लावली आहेत. त्यांची आता वाढ झाली असून त्याला जंगलाचे स्वरूप येत आहे.
—————————————————————–
‘निसर्गाशी नाते प्रत्येकाने जोपासली पाहिजे.त्यामुळे माणसांना मुबलक ऑक्सिजन मिळते. यासाठी शुद्ध हवेसाठी देशी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी वृक्षाचे संगोपन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी मी माझा खारीचा वाटा या वृक्ष भेटी उपक्रमाद्वारे उचलण्याचा प्रयत्न करत आहे.’
नामदेव चौगुले,
पर्यावरणप्रेमी शिक्षक, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत गणेश मूर्ती कामाचा ‘श्री गणेशा’ : शहर, ग्रामीण भागातील मंडळाकडून नोंदणी सुरू

Spread the love  निपाणी (वार्ता) : यंदा जुलै महिन्यातील सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा होणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *