Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love

 

बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड शाळा भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एकत्र येत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता सावगाव येथून मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थी एकत्रितपणे बेळगावकडे रवाना होणार आहेत.

सकाळी १०.३० वाजता शालेय शिक्षण विभागाच्या बीईओ (ब्लॉक शिक्षण अधिकारी) आणि डीडीपीआय (उपसंचालक, सार्वजनिक शिक्षण विभाग) कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून, मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या आंदोलनात गावातील सर्व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *