Monday , September 21 2026
Breaking News

रोटरी क्लब दर्पणच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस मोहीम

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब बेळगाव दर्पण, आयुष विभाग, शहापूर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भारत नगर तिसरा क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली.
जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेत हा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. बॅ. नाथ पै चौक येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात तसेच भारत नगर तिसरी गल्ली येथील मुचंडी यांच्या निवासस्थानी शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली.

यावेळी रोटरी दर्पणच्या अध्यक्षा रूपाली जनाज, सेक्रेटरी शितल चिलमी, इव्हेंट चेअरपर्सन अश्वगंधा कुगजी, कावेरी करूर, रेश्मा जीतुरी, सविता वेसने, काळभैरवनाथ मंदिराचे महांतेशनाथ महाराज, उदय राऊळ, श्रीनिवास राऊळ, दामोदर राऊळ, श्रीकांत काकतीकर, हरीश दिवटे, ईश्वर जोरापुरे, अनिल मुचंडी, सारिका काकतीकर, यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. आयुष विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत संगोळी यांचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *