Sunday , July 26 2026
Breaking News

अनगोळ शिवारातील टीसी बदलल्याने शेतकऱ्यांतून समाधान

Spread the love

 

बेळगाव : गेल्या आठ दिवसापूर्वी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतात बसवलेला टीसी पावसाळ्यात शॉर्ट होऊन बष्ट झाल्याने निकामी होता. या भागात आता भात लावणी करण्यासाठी पावसाची शाश्वती शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज होती. म्हणून संबंधित मुख्य विद्युत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन ताबडतोब टीसी बदलून दिलासा द्यावा असे सांगितले होते. कारण शेतातील कोनतिही टीसी जळाल्यास 24 तासाच्या आत तो बदलून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे हा सरकारचा नियम आहे. त्यासाठी सदर टीसी बसवण्यासाठी विद्युत कर्मचारी कामाला लागले. त्यासाठी आता शेतात भातपीकं असल्याने टीसी जाग्यापर्यंत नेण्यासाठी अडचण असल्याने शेतकऱ्यांनीच बैलगाडीतून येळ्ळूर रस्त्यावरुन बाळेकुंद्री यांच्या शेतापर्यंत नेऊन ठेवली. ती लवकरच सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विद्युत अधिकारी, कर्मचारी कामाला लागल्याने शेतकऱ्यांना मोठे समाधान झाले आहे. सदर टीसी बाळेकुंद्री यांच्या शेतातून येळ्ळूर रस्त्याकडेला बसवल्यास विद्युत कर्मचाऱ्यांनाही सोयीचे व संरक्षित होईल यासाठीही शेतकरी प्रयत्न करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *