Tuesday , June 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

  बंगळूर : कर्नाटकमध्ये इंधनाच्या किमतीत तीन रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, कारण राज्य सरकारने शनिवारी (ता. १५) पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला आहे, जो तत्काळ लागू होईल. शनिवारी राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक विक्रीकर (केएसटी) पेट्रोलवरील २५.९२ टक्क्यांवरून २९.८४ टक्के आणि डिझेलवर १४.३ टक्क्यांवरून १८.४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे …

Read More »

शहापूरात दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे आग : लाखो रुपयांचे नुकसान

  बेळगाव : बेळगाव येथील शहापूर येथील होसूर हरिजन गल्ली येथे एका कुटुंबातील दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील पैसे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शिवराज अशोक मोदगे व शशिकांत मोदगे यांच्या घरात विवाह सोहळा असल्याने घरात ठेवण्यात आलेले पैसे, दागिन्यांसह …

Read More »

आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश

  बेळगाव : फोंडा गोवा येथे नुकत्याच साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावात संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूणी घवघवीत यश संपादन करताना द्वितीय क्रमांकासह तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच रनर्सअप चॅम्पियनशिप पटकाविली. यांनी या स्पर्धेत एकूण 67 पदके पटकाविली यामध्ये 26 सुवर्ण 20 रौप्य …

Read More »

राज्यात ४५ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला अनुमती

  प्राथमिक ३५ हजार, माध्यमिक १० हजार शिक्षकांची नियुक्ती बंगळूर : शालेय शिक्षण विभागाने सरकारी प्राथमिक शाळांसाठी ३५ हजार आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी १० हजार अशा एकूण ४५ हजार अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील सुमारे ४९ हजार ६७९ सरकारी शाळांमधील अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी …

Read More »

जागतिक रक्तदान दिनानिमित्त ‘इनरव्हील’तर्फे रॅली

  बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव येथील जैन हेरिटेज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. दावणगेरे येथील ब्लडमॅन शिवकुमार म्हादिमाने हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. धर्मवीर संभाजी चौकातून धर्म. संभाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे किर्लोस्कर रोड, रामदेव …

Read More »

बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा

  बेळगाव : दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदतर्फे आज चव्हाट गल्ली येथे बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या विशेष सभेमध्ये सहभागी झाले होते. प्रमुख म्हणजे मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, …

Read More »

भुतरामहट्टीजवळ टिप्पर – बसचा अपघात; कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी

  बेळगाव : भुतरामहट्टीजवळ टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींवर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथील विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देऊन …

Read More »

वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था; डागडुजी करण्याची मागणी

  बेळगाव : वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकवेळा लहानसहान अपघात घडत आहेत. वेळोवेळी निवेदन देऊन …

Read More »

लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुराप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती

  बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. येडियुराप्पा यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाने येडियुराप्पा यांना 17 जून रोजी तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या …

Read More »

गरजू विद्यार्थ्याला नियती फाउंडेशनकडून आर्थिक मदत

  बेळगाव : बेळगावच्या नियती फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली. ताशिलदार गल्ली येथे राहणाऱ्या रचित पाटील या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. अलीकडेच त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने घरचा पूर्ण भार त्याच्या आईवर आहे. अशा परिस्थितीत रचितच्या शाळेचा खर्च उचलणे या कुटुंबाला कठीण झाले …

Read More »