Monday , September 21 2026
Breaking News

पावसाचा जोर लक्षात घेऊन उद्या एक दिवसाची सुट्टी जाहीर!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या बुधवार दिनांक 24 जुलै रोजी आणखी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 24 जुलै रोजी बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी, सर्व प्रकारच्या प्राथमिक माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीचे वर्ग बंद राहतील असे कळवण्यात आले आहे.

याच बरोबरीने बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, कित्तूर आणि कागवाड या तालुक्यामध्ये अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *