बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाजवळ पाय घसरून नदीत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहन पाटील (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नैवेद्य सोडण्यासाठी मित्रासोबत नदीवर गेला असता पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. रोहन पाटील यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना अंकली पोलीस ठाण्यात घडली.