बेळगाव : उद्या दि. १२ जुलै रोजी बेळगावमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती केली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली. आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. संदीप पाटील म्हणाले की, …
Read More »LOCAL NEWS
फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मिडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहापूर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चाळके, सामाजिक कार्यकर्ते विल्सन …
Read More »भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात
तसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा बेळगाव : भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस तसेच डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूरज जोशी आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक उपस्थित …
Read More »मराठा लाईट इन्फंट्री येथे अग्निवीर विविध पदांसाठी २ ऑगस्टपासून भरती मेळावा
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या दि. 2 ते दि. 9 ऑगस्ट 2025 दरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लार्क आणि अग्निवीर ट्रेडसमॅनसाठी युनिट हेडकॉटर्र कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा फक्त युद्ध विधवा, सैनिक, माजी सैनिक …
Read More »अनगोळ येथे ३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बेळगाव : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असताना, बेळगाव शहरात गुरुवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात घडली. इब्राहिम देवलापूर (३७) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. भारतीय सैन्यात सेवा दिल्यानंतर ते …
Read More »आषाढी एकादशी निमित्त श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे भजनाचा कार्यक्रम…
बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. ०९/०७/२०२५ रोजी गंगा नारायण सभागृहात झालेल्या कार्यक्रमास योगगुरू डॉ. पटृनशेटी व महिला अध्यक्ष सौ. वर्षा घाडी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. हंदीगनूर गावातील भजनी मंडळाच्या पंचवीस भगिनींनी भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. …
Read More »संतमीरा, शांतिनिकेतन, स्वामी विवेकानंद, देवेंद्र जीनगौडा, हनिवेल शाळा उपांत्य फेरीत
बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक गटात संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद खानापूर आणि हनिवेल खानापूर, देवेंद्र जीनगौडा शिंदोळी या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे …
Read More »गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जी आय, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते …
Read More »देशपांडे गल्लीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी
बेळगाव : बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात काल गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आरती केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून स्वामी समर्थांच्या …
Read More »सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत तीन कोटी ८१ लाख जमा
बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली असून, एप्रिल ते जून येथील महिन्याच्या कालावधीत देणगी स्वरूपात ३ कोटी ८१ लाख रुपये देणगी जमा झाली आहे. सलग दोन दिवस देणगीची मोजदाद करण्यात आली. मंदिराला देणगीच्या स्वरूपात ३ कोटी ३९ लाख ४० हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. यांसह …
Read More »