हुबळी : हुबळी ईश्वर नगर येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांतून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैष्णव देवी मंदिराचे पुजारी देवप्पाज्जा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी देखील एका पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पण सुदैवाने त्यावेळी पुजारी बचावले होते असे सांगण्यात येते. येथील नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.