Monday , September 21 2026
Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योती सेंट्रल स्कूलची सायकल रॅली उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव, सांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली.

चेन्नम्मा सर्कल येथे आयोजित सायकल रॅलीचे उद्‌घाटन पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ समाजसुधारक श्री. शिवाजीराव कागणीकर व शाळेचे माजी अध्यक्ष श्री. पी. डी. काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी एस.एम.सी. अध्यक्ष प्रा. श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रो. श्री. आर. एस. पाटील, सचिव प्रो. नितीन घोरपडे, एस. एम.सी. सदस्य श्री. तेजराज काळे, डॉ. श्री. डी.एन्. मिसाळे सर, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील तसेच उपप्राचार्या सौ. सोनाली कंग्राळकर उपस्थित होते, सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल रॅली चेन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ होऊन रेल्वे स्थानक मार्गे यु-टर्न घेत शाळेपर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि सायकल वापराचे महत्त्व याबाबत जनजागृती केली.

रॅलीमध्ये वि‌द्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. “गो ग्रीन”, “सेव्ह अर्थ” आणि “राईड क्लीन” अशा घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *