Monday , September 21 2026
Breaking News

मुक्तांगण विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव आर वाय पाटील, सदस्य एस एल पाटील हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए एल गुरव हे होते.
शाळेच्या प्राचार्या सौ सविता जेके यांनी स्वागत करून पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण कसे करावे याबाबतची माहिती आर वाय पाटील यांनी दिली तर पर्यावरण दिनाचे महत्त्व एस एल पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणाचे संरक्षण करण्याची तरुण पिढीची जबाबदारी ए एल गुरव यांनी स्पष्ट केली. सौ. गीतांजली पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. शीला कुंटे यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेच्या आवारात काही झाडे लावण्यात आली. तर शाळेच्या नवीन इमारतीच्या परिसरात अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षक वर्गाने उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *