Sunday , July 26 2026
Breaking News

सहकाररत्न उत्तम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान उत्तम पाटील म्हणाले, डी. के. शिवकुमार साहेब हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांची प्रशासनावरील पकड, निर्णयक्षमता आणि तळागाळातील जनतेशी असलेली नाळ यामुळे कर्नाटकच्या विकासाला नवी दिशा मिळेल. सीमाभागातील मराठी बांधवांच्या अपेक्षाही त्यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील, असा विश्वास असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनीही निपाणी मतदारसंघातील जनतेच्या भावना जाणून घेतल्या व सीमाभागाच्या सर्वांगीण त विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. कर्नाटक राज्य आता विकास, प्रगती आणि जनकल्याणाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, अशी सदिच्छा उत्तम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याला लाभलेले हे दूरदृष्टीचेनेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाची नवी दिशा देणारे व जनतेच्या विश्वासाचा विजय ठरणार असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
या भेटीमुळे सीमाभागातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निपाणी व कर्नाटक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *