Sunday , July 26 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने सागर बी. एड्. च्या नागरिक प्रशिक्षण शिबिरात “सेवा-संस्कार” व्याख्यान- वृक्षारोपण

Spread the love

 

बेळगाव : सागर बी. एड्. महाविद्यालयातर्फे आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत बेनकनहळ्ळी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने “सेवा व संस्कार” याबाबत विशेष व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक व राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. सागर बी. एड्.चे प्राचार्य आर. व्ही. हळब, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे, प्रांत संगठन सचिव विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, डॉ. नवीनकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी सुश्राव्य प्रार्थना व स्वागतगीत प्रस्तुत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी रोपटे व पुष्गुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.
यावेळी बोलताना डॉ. जे. जी. नाईक म्हणाले, कोणतेही सेवाकार्य करीत असताना आपण संकोच न बाळगता संपूर्ण निष्ठेने, अभिमानाने व प्रामाणिकपणे केले पाहिजे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले सेवाकार्य शिस्तबध्दपणे पूर्णत्वास न्यावे. राष्ट्रनिर्माण कार्यासाठी आपले योगदान अवश्य द्यावे व देशाला समृध्द बनवावे.
प्रा. अरुणा नाईक म्हणाल्या, शिक्षक समाज घडवतो. आपण भावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगले संस्कारही दिले पाहिजेत. गुणवत्ता वाढीसाठी योग्य व प्रामाणिक प्रयत्न करावेत. आपले आचार-विचार, अभ्यासूवृत्ती आणि चारित्र्य नेहमी आदर्शपूर्ण ठेवावे. समाजप्रबोधनातून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी.
स्वाती घोडेकर म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना अहंकार त्यागून निरपेक्ष भावनेने चांगले विद्यार्थी घडवावेत व विद्यार्थ्यांसमोर नेहमीच आदर्श ठेवावा. सामाजिक बांधिलकी ठेऊन शिक्षणासोबत समाजसेवा व राष्ट्रकार्यातही आपले योगदान जरूर द्यावे. ‘महिला सबलीकरण’ याविषयीदेखील त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
सागर बी. एड्.चे प्राचार्य आर. व्ही. हळब यांनीही प्रशिक्षणार्थींना उदबोधक मार्गदर्शन केले व भारत विकास परिषदेच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमास एस.बी.जी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सहकार्य लाभले. भाग्यश्री पाटील व सविता वाली यांनी सूत्रसंचालन केले. विनायक घोडेकर आणि डी. वाय. पाटील यांनी कार्यक्रम संयोजन केले. डॉ. एम्. बी. नरसन्नावर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिषद सदस्य, प्राध्यापक वर्ग व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *