Sunday , September 20 2026
Breaking News

बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा

Spread the love

 

बेळगाव : बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्या वृंदा चेन तसेच आर्ट अफेअर्स मासिकाचे अक्षय बापट उपस्थित होते.
अक्षय बापट यांनी विद्यार्थ्यांना कला प्रदर्शने, संग्रहालये आणि कलाक्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी चंद्रशेखर रांगणेकर यांच्या कलाप्रवास आणि कलाकृतींविषयीही मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे कला विद्यार्थ्यांना एका अनुभवी कलाकाराच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विविध माध्यमांमध्ये केलेल्या कामांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी रांगणेकर यांचे प्रात्यक्षिक उत्सुकतेने पाहिले आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रांगणेकर यांनी लाईव्ह डेमोद्वारे चित्रनिर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली. कलाकृती तयार करताना आवश्यक असलेली एकाग्रता, सातत्य आणि निरीक्षणशक्ती यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यशाळेनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *