Sunday , September 20 2026
Breaking News

वारसांना सर्व मालमत्ता देण्यापूर्वी विचार करा : ऍड. मारूती कामाण्णाचे यांचा सल्ला

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना कायद्याने कवच कुंडल प्रदान केली असून ती समजून घेण्याची गरज असल्याचे मत ऍड. मारूती कामाण्णाचे यांनी व्यक्त केले.
बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्याचे कवच कुंडल’ या विषयावर बोलत होते. डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ, टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी कामाण्णाचे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, संरक्षण, हक्क याबाबत सांगून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तर आपल्या वारसदाराना मालमत्तेचे संपूर्ण अधिकार न देता काही भाग आपल्याकडे राखून ठेवावा असा कानमंत्रही उपस्थितांना दिला.
यावेळी अश्विनी पाटील, स्नेहलता व रविंद्रनाथ जुवळी, सुरेन्द्र देसाई , प्रकाश कुडतरकर, पांडुरंग कारकल, विजय बांदिवडेकर, प्रभाकर देसाई, रत्नमाला पोळ यांनी हिंदी, मराठी, कन्नड गीते सादर केली. तर भरत गावडे यांनी कविता सादर केली. अशोक लोकूर यांनी ओमकाराचे यांनी महत्त्व सांगितले. प्रारंभी विश्वास धुराजी यांनी प्रार्थना सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी प्रास्ताविक केले तर शिवराज पाटील यानी पाहुण्यांची ओळख करून दिली. के. एल. मजूकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *