Sunday , August 16 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व दूरदर्शी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर, उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर व शिक्षक श्री. मनोहर करडी, श्री. पिराजी लोहार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून समाजातील समानता, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे.” तसेच त्यांनी महाराजांच्या कार्याची विविध उदाहरणांसह माहिती दिली.

यावेळी शिक्षिका सौ. आरती चिंगळी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या महान कार्याचा व सामाजिक सुधारणांचा आढावा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला. शिक्षण, समानता आणि समाजसेवेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना स्मरण करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कबाबत हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना राजेंद्र वड्डर- पवार यांचे निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क गेल्या पाच वर्षापासून बंद स्थितीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *