Monday , September 21 2026
Breaking News

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; अभियांत्रिकीत तनिषा कार्तिक, पशुवैद्यकीयमध्ये नयना गोपी अव्वल

Spread the love

 

बंगळूर : सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी)चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे (केईए) कार्यकारी संचालक एच. प्रसन्न यांनी दिली.

यंदा अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी ३.३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून परीक्षा दिली होती. राज्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर २३ आणि २४ एप्रिल रोजी परीक्षा पार पडली होती.

अभियांत्रिकी शाखेतील पाच टॉपर्स

तनिषा कार्तिक – आर.व्ही. पीयू कॉलेज, जयनगर, बंगळुर
सृजन बी. एस. – केएमडब्ल्यूए पीयू कॉलेज
निनाद वसिष्ठ – आर. व्ही. पीयू कॉलेज, जयनगर, बंगळुर
इरा जैन – द लर्निंग सेंटर पीयू कॉलेज, मंगळुर
रिशन फर्नांडिस – द लर्निंग सेंटर पीयू कॉलेज, मंगळुर

पशुवैद्यकीय शाखेतील पहिले पाच विद्यार्थी

नयना गोपी – बेस पीयू कॉलेज, शिवनगर, बंगळुर
अमूल्या एस. – सर एम.व्ही. पीयू कॉलेज, दावणगेरे
रित्विक कुमार – आर.व्ही. पीयू कॉलेज, जयनगर, बंगळुर
बसवराज अवती – शासकीय मुलांचे पीयू कॉलेज, विजापूर
सुचिता एम. – श्री चैतन्य पीयू कॉलेज, दावणगेरे

कृषी, रेशीम, वनीकरण आदी अभ्यासक्रम

निनाद वसिष्ठ – आर.व्ही. पीयू कॉलेज, बंगळुर
अनमोल प्रभू – अर्जुन सायन्स पीयू कॉलेज, धारवाड
समय ए.एस. – एक्स्पर्ट पीयू कॉलेज, मंगळुर
ऋषिका के.एस. – एक्स्पर्ट पीयू कॉलेज, मंगळुर
ऋतुल एस. रेड्डी – आर.व्ही. पीयू कॉलेज, बंगळुर

नर्सिंग अभ्यासक्रम
नयना गोपी, अमूल्या एस, रित्विक कुमार, , सवराज अवती,
सुचिता एम.

योग व नॅचरोपथी
नयना गोपी, अमूल्या एस., सुचिता एम., रित्विक कुमार, जोहान जॉब

बी.फार्मा
नयना गोपी, अमूल्या एस., सुचिता एम., जोहान जॉब, रित्विक कुमार

फार्मा-डी
नयना गोपी, अमूल्या एस., सुचिता एम., जोहान जॉब, रित्विक कुमार

नयना गोपी, निनाद वसिष्ठ आणि तनिषा कार्तिक यांनी विविध शाखांमध्ये अव्वल कामगिरी करत विशेष लक्ष वेधून घेतले आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता आला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *