Saturday , June 6 2026
Breaking News

येळ्ळूरमधील समस्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील यांना नागरिकांचे निवेदन

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर गावामधील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील नागरिकांनी बेळगाव दक्षिण दक्षिण भागाचे आमदार अभय पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीच्या समोर असलेला येळ्ळूरमधील महत्त्वाचा चौक म्हणजे लक्ष्मी चौक होय. या चौकात सर्वत्र पेव्हर्स बसवून या चौकाचे सुशोभीकरण करावे, तसेच सिद्धेश्वर गल्लीचा वरचा भाग व खालील भाग या दोन्ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही गल्ल्यांमध्ये सुद्धा पेव्हर्स बसून द्यावेत, तसेच सिद्धेश्वर मंदिरासमोरील चौकाची सुद्धा पेव्हर्स बसून सुशोभीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन आमदार अभय पाटील यांना सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, कमिटी, सिद्धेश्वर युवक मंडळ व गल्लीतील नागरिकांच्या वतीने आमदार अभय पाटील यांना देण्यात आले.

निवेदनाचा स्वीकार करून आमदार अभय पाटील यांनी उपरोक्त समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित कंत्राटदाराला त्यांनी फोन करून या समस्या लवकरात लवकर सोडाव्यात असे सांगितले. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्या राजकुंवर पावले, डॉ. तानाजी पावले, प्रा. सी. एम. गोरल, सुरज गोरल, परशराम गोरल, चिंगटू गोरल, जोतिबा गोरल, गंगाराम कणबरकर, वसंत काटकर, संदेश डोण्यांणावर, हर्ष काटकर, बाबुराव डोण्यांणावर, शिरोमणी डोण्यांणावर, सुजल गोरल, सप्रेम कणबरकर आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सोन्या-चांदीचे १८ लाखांचे दागिने जप्त; घरफोडी प्रकरणी संशयित अटकेत

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध भागांत घरफोडी व चोरीच्या घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *