Sunday , July 26 2026
Breaking News

जादूटोण्याच्या संशयाने पोटच्या मुलींची हत्या करणाऱ्या नराधमास जन्मठेप

Spread the love

 

बेळगाव: जुलै 2021 मध्ये, आरोपी अनिल चंद्रकांत बांदेकर, बेळगाव याने एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर 2रा क्रॉस, कंग्राळी (खुर्द) गावातील आपल्या घरासमोर कोणीतरी जादूटोणा केल्याने नाराज झालेल्या नराधम पित्याने आपल्या अंजली (8) आणि अनन्या (4) यांची विष पाजून हत्या केली होती.
नराधम पतीच्या विरुद्ध पत्नी जया बांदेकर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील नसरीना बंकापुरे यांनी युक्तिवाद केला. सहाव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस तपास पुरावे व युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला जन्मठेप व 20 हजार दंडाची शिक्षा सुनावली.
एपीएमसी स्टेशनचे पीआय मंजुनाथ हिरेमठ आणि तपास सहाय्यक वीरभद्र बुधनावर यांनी आरोपींना शिक्षा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्यामुळे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग आणि डीसीपींनी त्यांचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *