Monday , September 21 2026
Breaking News

चोरीच्या संशयावरून गणपत गल्लीत महिलांना मारहाण

Spread the love

 

बेळगाव : दिवाळीपूर्वीच्या सणासाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते. अशातच महिलांना चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना आज बेळगावच्या गणपत गल्लीत घडली.

बेळगावच्या गणपत गल्ली मार्केटमध्ये आज सकाळी चोरीच्या संशयावरून महिलांना मारहाण करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अशा घटनांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी तातडीने खडेबाजार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून महिला हवालदारांनी तपासणी केली असता त्यांच्याजवळ कोणतेही साहित्य आढळून आले नाही.
मात्र संशयित महिलांना खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *