Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव महापालिका आयुक्त पदी श्रीमती शुभा बी.; अशोक दुडगुंटी यांची तडकाफडकी बदली

Spread the love

बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची तडकाफडकी बदली करण्यात आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट सेलच्या संचालक असलेल्या श्रीमती शुभा बी. यांची बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अलीकडेच बेळगावमधील रस्ते विकासकामांमुळे मनपाला नुकसान भरपाईचा सामना करावा लागला. हा मुद्दा बेळगाव शहराच्या राजकारणासह नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच अचानक अशापद्धतीने बदलीचा आदेश जारी केल्याने पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कन्नड राज्योत्सव ८ ते १० दिवसांवर येऊन ठेपला असतानाच राज्योत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *