Saturday , November 7 2026
Breaking News

चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दि. ४ व ५ मे असा दोन दिवस साजरा होणार आहे. दि. ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील‌ प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील स्थानिक भजनी मंडळाचे संगीत भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक ५ रोजी सकाळी सात वाजता ब्रम्हलिंग देवाला अभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दुपारी १२-०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *