Friday , September 20 2024
Breaking News

चापगाव, कारलगा परिसरात समितीचा घरोघरी प्रचार

Spread the love

 

खानापूर : ०२ मे २०२४ चापगाव या ठिकाणी, कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ चापगाव गावभेट दौरा व कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आगमन झाले, नंतर “शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो” अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कुमारिका व सौ. यांच्या हस्ते निरंजन उदयसिंह सरदेसाई यांचे औक्षण करण्यात आले. यानंतर गावात घरोघरी जावून प्रचार कऱण्यात आला. तसेच गावातील थोरामोठ्याचे आशिर्वाद घेतले, नंतर कृष्ण मंदिर येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले, या बैठकीला चापगांव गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चापगाव गावचे सुपुत्र व समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मष्णू चोपडे यांनी प्रास्ताविक केले व समितीचे महत्व पटवुन दिले, त्यानंतर प्रथमतः महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते व माणिकवाडी गावचे सुपुत्र प्राध्यापक श्री. शंकर गावडा यांनी राष्ट्रीय पक्ष कशाप्रकारे मराठी भाषिकांना त्रास द्यायलेत आणि मराठी भाषेची कशी गळचेपी करायलेत याची इतिंभुत माहिती सांगितली, यानंतर चापगाव गावचे भाचे रणजित पाटील व पप्पु पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांना चापगाव गावातून 100% मतदान करून कर्नाटक व केंद्र सरकारला दाखवुन द्या की येथे मराठी बहुभाषिक राहतात, समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी सविस्तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा इतिहास सांगितला आणि आम्ही पहिल्यांदाच कारवार लोकसभेची निवडणूक का लढवत आहोत याचा सविस्तर वृत्तांत सांगितला, त्यानंतर मोहन गुरव आम्ही समितीच्या पाठीशी का उभे राहिले पाहिजे याचे महत्व पटवुन दिले, त्यानंतर लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की, आमच्या वडीलधारी मंडळींनी हा संयुक्त महाराष्ट्रचा लढा व चळवळ उभी केली आणि या सिमाप्रस्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक मराठी भाषिकांचे त्याग व बलिदान तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही, या सीमाप्रश्नच्या सोडवणुकीसाठी तुमची आज मला साथ हवी आहे आणि तुम्ही ती मला द्याल यात तिळमात्र शंका नाही, कारण या समितीच्या चळवळीसाठी चापगाव गावचे फार मोठे योगदान आहे हे आम्ही कदापि विसरणार नाही, तरी तुमचे अनमोल असे मत मला द्या आणि मराठी भाषिकांचे व मराठी भाषेच रक्षण करण्याची संधी मला नकीच द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यानंतर माजी तालुका पंचायत समितीचे सदस्य श्री. बाळासाहेब शेलार यांनी असे सांगितले की, महाराष्ट्र एकीकरण समिती ही सर्व
सामन्या मराठी भाषिकांनी आजतागायत टिकवलेली आहे म्हणून आज आम्ही खेडोपाडी फिरत आहोत, तरी आम्ही तुम्हा वडीलधारी मंडळींचे त्याग आम्ही कदापि विसरणार नाही, आणि आमचा सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे आणि त्याचा निकाल आज ना उद्या नक्की लागणार यात तिळमात्र शंका नाही. त्यानंतर रमेश धबाले यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमच्या चापगाव
गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा देत आहे, तेंव्हा उपस्थित चापगाव ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आपला पाठींबा दर्शविला.
या सभेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, पुंडलिक पाटील, मुकुंद पाटील, भीमसेन करंबळकर, राजाराम देसाई, संदेश कोडाचवाडकर, हेमंत घाडी, राघोबा मादर, उदय पाटील, सुधीर पाटील, अशोक बेळगावकर, नामदेव बेळगावकर, भरमाना पाटील, भरमानी जीवाई, वैभव जीवाई, पुंडलिक सुतार, राजु कदम, यलाप्पा कदम, नंदु पाटील, सुनील धबाले, पप्पु आंबाजी, परशराम आंबाजी, सुभाष बिरजे, मारुती कुकडोळकर, नागो कुराडे, गोपाळ सुतार, सोमानिंग धबाले, परशराम यळगुकर, आनंद पाटील, गंगाराम जिवाई, हणमंत गुरव, पांडू पाटील, गणपती सुळगेकर, तुकाराम अंबाजी, नारायण यळगुकर, हणमंत बेळगावकर, अरुण धबाले, सुनील धबाले, सदन कदम, अशोक यळगुकर तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

Spread the love    खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *