Monday , September 21 2026
Breaking News

सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2026 -27 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव अनोख्या पद्धतीने, बैलगाडीतून सरस्वती मातेचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. पारंपारिक ढोल आणि झांज पथकाच्या गजरात नूतन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पवृष्टीने आरती करून करण्यात आले. शाळा रांगोळी, पताका, फुगे आणि तोरणानी सजवली होती. प्रारंभोत्सव कार्यक्रमासाठी शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री.रवी बजंत्री सर, क्षेत्र समन्वय अधिकारी श्री.आय.डी. हिरेमठ सर, सी.आर.पी. सनदी सर उपस्थित होते. एस.डी.एम.सी.अध्यक्ष श्री.उत्तम पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा आयोजित करण्यात आली. नुतन मुख्याध्यापक श्री. के.एम. बेलगामी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. विद्यार्थ्यांना सरकारमार्फत देण्यातआलेल्या पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वितरण करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका दीपा देसुरकर यांनी पालक सभेचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन ज्येष्ठ कन्नड शिक्षिका विजया रसाळ यांनी केले. कार्यक्रमाला एसडीएमसीचे सदस्य, उत्साही पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *