Sunday , July 26 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.
कोणी पोलीस, कोणी सैनिक, डॉक्टर, शिक्षक त्याचबरोबर शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विविध पारंपारिक वेशात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी शाळेत अगदी उत्साहात उपस्थित होते. यावेळी शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर यांच्या वतीने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला सर्व विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिलचे वितरण करण्यात आले. यावेळी इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे वर्गात स्वागत केले.
त्यानंतर पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थिनींच्या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थी यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी स्वागत केले. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल पालकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
शाळेच्या पहिल्या दिवशीच महेश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. नवीन बॅग त्याचबरोबर पाटी पेन्सिल, नवीन वातावरण, वर्ग सजावट हे सर्व पाहून इयत्ता पहिलीचे चिमुरडे भारावून गेले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला. विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खास बाहुले शाळेमध्ये आणण्यात आले होते.
मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी “पहिलीचा हा पहिला दिवस मुलांसाठी खूप खास असतो. शाळा हे मुलांचे दुसरे घर आहे, आणि इथे त्यांना दर्जेदार मातृभाषेतून शिक्षणा बरोबर आनंदही मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.” अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन उदय पाटील यांनी केले.
शालेय प्रारंभोत्सवामुळे नवीन विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस सुखद आणि विस्मरणीय झाला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *