Sunday , July 26 2026
Breaking News

आमदार संतोष लाड यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावे; निपाणी भाग मराठा समाजाची मागणी

Spread the love

 

निपाणीत झाली सकल मराठा समाजाची बैठक

निपाणी (वार्ता) : मराठा समाजाचे कॉंग्रेसचे कर्तबगार आमदार संतोष लाड यांना कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी राज्यातील समस्त मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील सर्वपक्षीय मराठा समाजातर्फे त्यांना डी. के. शिवकुमार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची संधी देण्याची मागणी निपाणी येथील मध्यवर्ती ‌छत्रपती शिवाजी चौक येथील मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली.
बाळासाहेब सुर्यवंशी यांनी, संतोष लाड यांनी मराठा समाजाच्या माध्यमातून कॉंग्रेसला सदैव बळकटी मिळावी म्हणून कार्य केले आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक मराठा समाज असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष लाड यांना कॅबिनेट मंत्री म्हणून म्हणून पद देण्याची मागणी केली. याशिवाय एकमुखाने मराठा समाजातर्फे ही मागणी करण्यात आली आहे. त्याचा समाजाला लाभ होणार असल्याचे सांगितले.
गोपाळ नाईक म्हणाले, डी. के. शिवकुमार सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. कॉंग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. मराठा समाजाला न्याय देत संतोष लाड यांना मंत्रीमंडळात स्थान देवून त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देण्याची मागणी केली.
दिपक वळीवडे यांनी, संतोष लाड हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत. सर्व समाजाला सोबत घेत नितीमूल्ये जपणारे, अभ्यासू नेतृत्व असून त्यांना राज्याचे अर्थमंत्री पदी निवड करण्याची मागणी केली. माजी नगरसेवक दिलीप पठाडे, विनोद साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त करत सर्वांना सोबत घेऊन समाजहिताची कामे करण्यात आली आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे असे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले सडोलकर, राजेंद्र चव्हाण, गोपाळ नाईक, माजी सभापती बाळासाहेब देसाई- सरकार, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, जयराम मिरजकर, बाबासाहेब तिप्पे, ज्ञानेश्वर ढेरे, दीपक सावंत, विजय -हाटवळ, राजू कोपार्डे, उत्तम कामते, अतुल चावरेकर, सुनील हिरुगडे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *