Monday , September 21 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महेश फाउंडेशनकडून स्कूल बॅगचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम महेश फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करून संस्थेने शिक्षणप्रेमी सामाजिक बांधिलकी जपली.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच शैक्षणिक साहित्याच्या खर्चामुळे पालकांवर येणारा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन बॅग मिळाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

कार्यक्रमास महेश फाउंडेशनचे प्रतिनिधी अक्षय शिगेहल्ली व सहकारी, शाळेचे ब्रँड अँम्बेसेडर संतोष दरेकर, मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी मान्यवरांचे स्वागत करून महेश फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संतोष दरेकर यांनी महेश फाउंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. नवीन बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या मनात निर्माण झालेला समाधानाचा भाव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले महेश फाउंडेशन गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असून, भविष्यातही अशा समाजोपयोगी योजनांद्वारे विद्यार्थ्यांना बळ देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *