Tuesday , June 2 2026
Breaking News

बेळगाव पोलिसांची धडक कारवाई; जुगार, मटका आणि गांजा प्रकरणात १० जण ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : शहरातील बेकायदेशीर कारवायांवर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम राबवत जुगार, मटका आणि गांजा सेवनाविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहापूर पोलिसांनी बळ्ळारी नाल्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून धनराज ऊर्फ बंटू सुतार, नजीर पठाण, श्रीधर लोहार, राहुल हळगेकर, नागप्पा नाईक, विनायक दरमूड आणि विश्वनाथ गोटडकी या सात जणांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून ४७ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील शशी जालगार हा संशयित घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, टिळकवाडी पोलिसांनी भाग्यनगर परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या सूरज श्याम शानभाग (३५) याला ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

याशिवाय मटका व्यवसायाविरोधातील स्वतंत्र कारवाईत आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या यशस्वी मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना

Spread the love  बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, साधेपणा, विनम्रता आणि जनसामान्यांशी कायम नाळ जपणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *