Monday , September 21 2026
Breaking News

पीएसआय, डीवायएसपी यांची नावे लिहून व्यक्तीची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेंडीगेरी गावात एका व्यक्तीने पीएसआय, डीवायएसपीसह काही जणांची नावे पत्रात नमूद करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मृताची ओळख रवींद्र दानव्वगोळ अशी झाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपणास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे समोर आले आहे.

पत्रानुसार, लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पुजारी यांच्याकडून त्यांनी आठ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड मागितल्यानंतर संबंधितांकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच पीएसआय आनंद आणि तत्कालीन डीवायएसपी मुल्ला यांनीही आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप पत्रात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

रवींद्र यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मूडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मूडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *