Sunday , July 26 2026
Breaking News

वर्षभरापासून नगरपालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा बंद

Spread the love

 

अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी; ‘लेट लथीपांना’ विचारणार कोण

निपाणी (वार्ता) : विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्यात आले आहेत. पण निपाणी नगरपालिका कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन व शहरापासून बंदच आहे. त्यामुळे कोणत्या अधिकारी व कर्मचारी कधी येतात कधी जातात, याची नोंद ठेवणे कठीण झाले आहे. तात्पुरते हजेरी पत्रक असले तरी उशिरा येऊनही नेहमीच वेळ घालून सही केली जात आहे. मनमानी करणाऱ्या लेट लतीफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणार कोण? असा सवाल व्यक्त होत आहे.
प्रशासनाने शिस्त आणण्यासाठी आणि गैरहजर कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी ही यंत्रणा पुन्हा सुरू केली असून काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केला आहे.
विविध तांत्रिक कारणांमुळे आणि जुन्या ऑनलाइन हजेरीत बिघाड झाल्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली काही काळ बंद होती. परंतु, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या कार्यालयात नवीन बायोमेट्रिक मशिन बसवून हजेरी पुन्हा सक्तीची केली. जुनी बायोमेट्रिक पद्धत बदलून तेथे पूर्णपणे ‘लिनक्स’ आधारित डिजिटल आणि फेशियल (चेहऱ्यावरून ओळखणारी) बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून हजेरीवर कडक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला.
नगरपालिकाकार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काही महिन्यापासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवलेली नाही. पालिकेत सध्या रजिस्टरवर सही करून हजेरी लावण्यात येत आहे. मशिनमध्ये बिघाड झाल्याने महिन्यात अनेक सुट्ट्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी पूर्ण भरण्यात आले आहेत. दुरुस्तीसाठी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली. मात्र या कालावधीत मशिन दुरुस्त होऊ न शकल्यामुळे आणखी मुदत वाढवून देण्यात आली. केवळ वर्षभरातच बायोमेट्रिक मशीन नादुरुस्त कसे झाले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एवढ्या लवकर मशिनमध्ये बिघाड होत असल्यास मशिनच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *