Monday , September 21 2026
Breaking News

व्हॅक्सिन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न

Spread the love

 

बेळगाव : समर्थ भारत प्रतिष्ठान च्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी आज सकाळी वॅक्सीन डेपो परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या भागात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर विखुरलेले साहित्य पाहून आप्पासाहेब गुरव व नेतलकर यांनी ते जमा करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून फिरावयास गेलेले अनेक जण त्यांच्या मदतीला आले आणि बघता बघता बराचसा प्लास्टिकचा कचरा जमा झाला. महानगरपालिकेच्या गाडीला बोलवून तो कचरा कचरा डेपोला पाठवण्यात आला. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबरच प्लास्टिकचा कचरा टाकून परिसर खराब करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज व्हॅक्सिन डेपो चा एक भाग स्वच्छ झाला ही मोहीम इतर भागातही अशाच पद्धतीने नेहमीच राबविली जाणार असल्याचे आप्पासाहेब गुरव यांनी यावेळी सांगितले

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *