बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी सायंकाळी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षी दीड दिवसांनी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यानुसार विधिवत पूजा-अर्चा व आरती करून भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि मांगल्याचा दाता असलेल्या गणरायाचे सोमवारी …
Read More »सीमाप्रश्नावर उद्या सर्वोच्च न्यायालयात लक्षवेधी सुनावणी!
१६ सप्टेंबरच्या बोर्डावर दावा; सीमाभागातील जनतेच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या प्रलंबित दाव्यावर उद्या, बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत सीमाप्रश्नाचा दावा समाविष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सीमालढ्याच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या सीमाभागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. सीमाप्रश्नाची सुनावणी …
Read More »श्री गणेश ट्रॉफी सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स, कंग्राळ गल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश ट्रॉफीच्या ४७व्या वर्षातील सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १० वाजता उत्साहात झाले. स्पर्धेचे उद्घाटन पंच व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शंकरराव बडवानाचे, विजय मोरे आणि सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच बाबुराव …
Read More »चव्हाट गल्ली अग्निकांड : पालकमंत्री सतीश जारकीहोळींची घटनास्थळी पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, …
Read More »ड्रायफ्रूट्सच्या दागिन्यांनी सजला माळी गल्लीचा पर्यावरणपूरक गणराया
झगमगाटाला फाटा देत साधेपणाने स्थापना; सलग सहाव्या वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश बेळगाव : विद्येची आणि कलेची देवता असलेल्या श्री गणरायाचे सोमवारी उत्साहात आगमन झाले. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, गणेशोत्सवाचा उत्साह पर्यावरणपूरक असावा, या उद्देशाने माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सलग सहाव्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली …
Read More »मराठी शाळांच्या घटत्या संख्येवर भाष्य करणारी गणेशोत्सवाची सजावट
रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्र. ३४, अनगोळ येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने अनगोळ येथील शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३४ येथे गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशमूर्तीचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे आगमन करण्यात आले. …
Read More »बेळगावातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू; आमदार आसिफ सेठ यांनी घेतली घटनास्थळी धाव
पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी भेट; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि युवा नेते अमन सेठ यांनी पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी धाव घेत …
Read More »सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी – बस भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख विनोद जोगेन्नवर (२२), आकाश जाधव (२०) आणि रवी कुरुबर (२२) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण दुचाकीवरून सौन्दत्ती-धारवाड मार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी …
Read More »पावसाची दडी : भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतेत
पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, खर्चही वसूल होण्याची चिंता बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील भातपिके करपू लागली आहेत. पिके हातातोंडाशी आली असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आतापर्यंत केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी भाताची …
Read More »चव्हाट गल्लीत एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत जळून मृत्यू; दोघे गंभीर
बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने बेळगाव शहर हादरले आहे. मृतांमध्ये शारदा धमुने (४५) आणि भारती धमुने (५०) प्रिया धमुने (२८) आणि गंगा धमुने (२५) यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta