Sunday , September 20 2026
Breaking News

सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी – बस भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) ही दुर्घटना घडली.

मृतांची ओळख विनोद जोगेन्नवर (२२), आकाश जाधव (२०) आणि रवी कुरुबर (२२) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण दुचाकीवरून सौन्दत्ती-धारवाड मार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी केएसआरटीसी बसला दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सौन्दत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याप्रकरणी सौन्दत्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *