







पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी भेट; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि युवा नेते अमन सेठ यांनी पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
या दुर्दैवी घटनेबद्दल आमदार आसिफ सेठ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. तसेच आगीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना केली.
मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणार असल्याचे आमदार सेठ यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta