Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

काळ्या दिनानिमित्त रविवारी शहरातील वाहतुकीत बदल!

  राज्योत्सव मिरवणूक संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर; अवजड वाहनांना प्रवेशबंदी बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी आयोजित काळ्या दिनाची मूक सायकल फेरी आणि कर्नाटक राज्योत्सवानिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी …

Read More »

१ नोव्हेंबर काळ्या दिनी शिवसेनेचे शिनोळी फाटा येथे आंदोलन

चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘चलो बेळगाव’चा नारा देत शिनोळी फाटा, चंदगड येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमाभागातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या दिवशी मूक सायकल …

Read More »

बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

  बेळगाव जिल्ह्यातील आरताळ गावावर शोककळा बेळगाव : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा जोशीमठजवळील हत्ती पर्वत परिसरात भीषण अपघात झाला. गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बंगळुरू गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांचा समावेश आहे. मिळालेल्या …

Read More »

ऐन दिवाळीत नंदिनी दूध महागणार!

    प्रतिलिटर आठ रुपयांची दरवाढ; १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू बेळगाव : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली असून, नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक असला, …

Read More »

काळ्या दिनाच्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

  मराठी अस्मितेसाठी निवडणुका जिंकण्याचा येळ्ळूर म.ए. समितीचा निर्धार येळ्ळूर : सीमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त आयोजित सायकल फेरीत येळ्ळूरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सीमाभागातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून मराठी भाषेप्रती असलेली अस्मिता आणि एकजूट दाखवून द्यावी, असे …

Read More »

एक नोव्हेंबर काळा दिन सायकल फेरीत प्रचंड संख्येने सामील व्हा

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार वेगवेळ्या भाषेची राज्ये निर्माण झाली. यावेळी कर्नाटकची निर्मिती करण्याच्या निमित्ताने बेळगाव कारवार आणि बिदरचा मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटकात (पूर्वीच्या म्हैसूर राज्यात) डांबण्यात आला. भाषावार प्रांतरचना करीत असताना मराठी भाषिक प्रदेशावर झालेल्या अन्यायाविरुद्ध एक नोव्हेंबर 1956 पासून सीमा भागातील मराठी …

Read More »

आनंदनगरात गृहीणीचा संशयास्पद मृत्यू; मित्राविरोधात कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

  गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; खुनाचा आरोप बेळगाव : शहरातील आनंदनगर वडगाव परिसरात एका ३३ वर्षीय विवाहित महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूनम अमित डेळेकर असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत तिच्यासोबत मैत्री असलेल्या रंजन मरवे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल …

Read More »

पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर १ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह

  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांच्यावतीने १ नोव्हेंबर म्हणजेच सीमा भागातील काळ्यादिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे, गेल्या ७० वर्षापासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे १९५६ साली तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बहुभाषिक मराठी प्रांत मैसूर राज्यात डांबला आणि …

Read More »

धामणे विभागातून शेकडो कार्यकर्ते काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत सहभागी होणार

बेळगाव : धगधगता सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी भाषिकांची एकजूट हाच सर्वांत मोठा आधार आहे. ही एकजूट कायम ठेवत १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धामणे विभागातून करण्यात आला. यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी धामणे बसस्थानक येथील कलमेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी …

Read More »

श्री गणहोम युवक मंडळाचा गणहोम व महाप्रसाद उत्साहात संपन्न

  बेळगाव : महाद्वार रोड, क्रॉस नं. ४ येथील श्री गणहोम युवक मंडळाच्या वतीने संकष्ट चतुर्थीनिमित्त आयोजित गणहोम व महाप्रसादाचा कार्यक्रम गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी सकाळी विधिवत पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारात गणहोम करण्यात आला. परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. …

Read More »