Friday , November 6 2026
Breaking News

एक नोव्हेंबर काळा दिन सायकल फेरीत प्रचंड संख्येने सामील व्हा

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार वेगवेळ्या भाषेची राज्ये निर्माण झाली. यावेळी कर्नाटकची निर्मिती करण्याच्या निमित्ताने बेळगाव कारवार आणि बिदरचा मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटकात (पूर्वीच्या म्हैसूर राज्यात) डांबण्यात आला. भाषावार प्रांतरचना करीत असताना मराठी भाषिक प्रदेशावर झालेल्या अन्यायाविरुद्ध एक नोव्हेंबर 1956 पासून सीमा भागातील मराठी जनतेच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध असंतोष प्रकट करण्यासाठी आणि सीमा भागातील मराठी जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा दर्शविण्यासाठी केंद्र सरकार विरुद्ध काळया दिनाचे आयोजन करण्यात येते यानिमित्ताने गेली 70 वर्षे मराठी भाषिक एकत्र येऊन आपल्या अन्यायाविरुद्ध केंद्र सरकारकडे दाद मागतात आत्तापर्यंत सत्याग्रह, साराबंदी, हरताळ, बंद, मेळावे, निदर्शने, मोर्चे अशा विविध माध्यमातून मराठी जनतेने आपला असंतोष प्रकट केलेला आहे. अनेकवेळा आश्वासने देऊनही केंद्र सरकारने हा प्रश्न प्रलंबितच ठेवला आहे. या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयातील या कायदेशीर लढाई बरोबर रस्त्यावरील लढाई ही ही महत्त्वाची आहे. रस्त्यावरील लढाईचा एक भाग म्हणून 1 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सायकल फेरीत सीमा भागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने भाग घेऊन आपली इच्छा पुन्हा एकदा केंद्र सरकारला दाखवावी. 1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीला सकाळी नऊ वाजता संभाजी उद्यान बेळगाव येथे मराठी जनतेने व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *