



बेळगाव : धगधगता सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी भाषिकांची एकजूट हाच सर्वांत मोठा आधार आहे. ही एकजूट कायम ठेवत १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धामणे विभागातून करण्यात आला.
यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी धामणे बसस्थानक येथील कलमेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी धामणे विभागातून शेकडो कार्यकर्ते काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत सहभागी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यान येथे एकत्रित जमून काळ्या दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सीमाप्रश्नाच्या लढ्याची तीव्रता कायम ठेवण्यासाठी मराठी भाषिकांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीला यल्लाप्पा रेमाणाचे, मनोहर जायाणाचे, बाळू केरवाडकर, मोहन पाटील, शिवाजी पाटील, सतीश जायाणाचे, दशरथ येळूरकर, वामन पाटील, तानाजी जायाणाचे, पंडित पाटील, तातोबा मरगाणाचे यांच्यासह धामणे विभागातील समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta