



११ डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बेळगाव : कर्नाटक राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदाही बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून, ११ डिसेंबरपर्यंत एकूण १० दिवस कामकाज चालणार आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू करण्याचा विचार होता. मात्र, आगामी पंचायत निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, ते ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अधिवेशनात राज्यातील विविध प्रशासकीय प्रश्न, विकासकामे, जनतेच्या समस्या तसेच महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात प्रशासकीय हालचालींना वेग येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta