Friday , November 6 2026
Breaking News

श्री गणहोम युवक मंडळाचा गणहोम व महाप्रसाद उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : महाद्वार रोड, क्रॉस नं. ४ येथील श्री गणहोम युवक मंडळाच्या वतीने संकष्ट चतुर्थीनिमित्त आयोजित गणहोम व महाप्रसादाचा कार्यक्रम गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

यावेळी सकाळी विधिवत पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारात गणहोम करण्यात आला. परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले.

सायंकाळी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सहकार्य करणारे देणगीदार, गणेशभक्त आणि परिसरातील नागरिकांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *