Friday , November 6 2026
Breaking News

राकसकोपच्या पाणीपातळीत घट; उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता वाढली

Spread the love

 

हिडकल जलाशयातील पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत किंचित कमी; आवक पूर्णपणे बंद

बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेल्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने आगामी उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

२९ ऑक्टोबर रोजी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २,४७२.६० फूट इतकी नोंदविण्यात आली. गतवर्षी याच दिवशी ही पातळी २,४७५.८० फूट होती. म्हणजेच वर्षभरात पाणीपातळीत ३.२० फुटांची घट झाली आहे. या जलाशयाची साठवण क्षमता ०.५ टीएमसी इतकी आहे.

दुसरीकडे, हिडकल जलाशयातील पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. या जलाशयात सध्या ५१ टीएमसी क्षमतेपैकी ५०.६०५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत ५०.८७० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा साठ्यात किंचित घट झाली असून जलाशयात पाण्याची आवकही पूर्णपणे थांबली आहे.

राकसकोपमधील घटता पाणीसाठा आणि हिडकल जलाशयात बंद झालेली आवक लक्षात घेता, आगामी उन्हाळ्यात बेळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *