Friday , November 6 2026
Breaking News

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत वाघवडे ग्रामस्थ मोठा संख्येने सहभागी होणार; सीमाप्रश्नाच्या लढ्याला पाठिंबा देण्याचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी आयोजित काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत वाघवडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सीमाप्रश्नाच्या लढ्याशी एकनिष्ठ राहत मराठी भाषिकांच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ सीमाभागात दरवर्षी काळा दिन पाळण्यात येतो. मूक सायकल फेरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी मांडून केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाते.

यावेळी पीएमसी सदस्य आर. के. पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक व पीकेपीएस चेअरमन ज्योतिबा नागेंद्र आंबोळकर, सोपान नाईक, रघु पाटील, परशुराम पाटील, सुनील पाटील, दाजीबा बेळगुंदकर, मंथन बेळगुंदकर, रवी भडस्कर, विनायक गुरव, यल्लाप्पा मुसळे, दीपक आंबोळकर, कुमार पाटील, उदय पाटील, मोहन पाटील, मनू पाटील, महेश काकतकर, मारुती केंदुरकर, नागेशी आंबोळकर, सचिन आंबुलकर, ज्योतिबा यल्लाप्पा आंबोळकर आणि एसडीएमसी अध्यक्ष संतोष आंबोळकर यांचा समावेश आहे.

काळ्या दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सीमाभागातील मराठी भाषिकांची एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *