Friday , November 6 2026
Breaking News

३४३ जणांची रक्तक्षय व दंत तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यविषयक उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपी हार्ट फाउंडेशन आणि केएलई डेंटल कॉलेज यांच्या सहकार्याने शिवबसवनगर येथील एसजीबीआयटी महाविद्यालयात रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण ३४३ जणांनी लाभ घेतला.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे, रक्तक्षयाबाबत जनजागृती करणे तसेच या आजाराचे वेळीच निदान होण्याचे महत्त्व पटवून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. यासोबतच नियमित दंत तपासणी आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्वतःच्या आधी सेवा’ (Service Above Self) या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती एस. मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *