Friday , November 6 2026
Breaking News

माजी मंत्री शिवानंद कौजलगी यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ मुत्सद्दी राजकारणी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि प्रतिष्ठित केएलई संस्थेचे माजी अध्यक्ष शिवानंद एच. कौजलगी यांचे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शिवानंद कौजलगी यांनी राजकारणासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कारासह राज्यातील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, आमदार महांतेश कौजलगी, काँग्रेस नेते बसवराज कौजलगी आणि एक कन्या असा परिवार आहे.

त्यांच्यावर शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अनीगोळ रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *