



पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांच्यावतीने १ नोव्हेंबर म्हणजेच सीमा भागातील काळ्यादिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे, गेल्या ७० वर्षापासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे १९५६ साली तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बहुभाषिक मराठी प्रांत मैसूर राज्यात डांबला आणि १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली.
गेल्या ७० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटक सरकार एनकेन प्रकारे सीमाभागातील मराठी भाषिकांवर दडपशाही करून त्यांना त्यांचे संविधानिक हक्क डावलत आहे. या सर्व गोष्टींचा निषेध व महाराष्ट्रातील सरकारला जागृत करण्यासाठी व सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून एक नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे. यासाठी पुणे भागातील समस्त मराठी भाषिकांनी यात सहभाग घ्यावा व ही निदर्शने यशस्वी करावी, असे आवाहन आयोजक विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, वैराळ सुळकर, सातेरी पाटील, गंगाराम वीर, मारुती पाटील व अर्जुन वीर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta