Friday , November 6 2026
Breaking News

ऐन दिवाळीत नंदिनी दूध महागणार!

Spread the love

 

 

प्रतिलिटर आठ रुपयांची दरवाढ; १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू

बेळगाव : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली असून, नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक असला, तरी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे.

दूध उत्पादक शेतकरी दीर्घकाळापासून दरवाढीची मागणी करत होते. त्यांच्या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

शेतकऱ्यांना प्रतिलिटर सात रुपयांचा लाभ

मंजूर झालेल्या आठ रुपयांच्या दरवाढीपैकी सात रुपये थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत, तर उर्वरित एक रुपया दूध संघांच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणार आहे. सरकारी अनुदानासह दूध उत्पादकांना प्रतिलिटर एकूण ४७ रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना महागाईचा चटका

दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ऐन दिवाळीत दूध महागणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चहा, कॉफी, मिठाई आणि विविध दुग्धजन्य पदार्थांच्या खर्चातही वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही दरवाढ ग्राहकांसाठी मात्र महागाईची झळ वाढवणारी ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *