Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मृणाल हेब्बाळकर यांच्यावर एआयसीसीची महत्त्वाची जबाबदारी

बेळगावच्या युवा नेत्याची काँग्रेस हायकमांडकडून समन्वयकपदी नियुक्ती नवी दिल्ली : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) माध्यम आणि प्रचाराशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चार समन्वयकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बेळगावचे युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. AICCच्या माध्यम व प्रचार …

Read More »

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

  घरगुती मूर्तींसाठी सहा फिरते विसर्जन कुंड; शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण बेळगाव : लाडक्या गणरायाचे आज घरोघरी उत्साहात आगमन झाले असून, यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बेळगाव महानगरपालिकेने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात सहा फिरते विसर्जन …

Read More »

बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचा जल्लोष!

    हरतालिका पूजेनंतर गणरायाचे स्वागत; गृहिणींची धावपळ, भक्ती आणि उत्साहाला उधाण बेळगाव : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने बेळगाव शहरासह परिसरातील घराघरांत आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आबालवृद्धांसह बालचमूही गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाने सहभागी …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी परिसरात पोलिसांचे संचलन

  बेळगाव : गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सुरक्षितपणे पार पडावा, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून सोमवारी (दि. १४) टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस संचलन करण्यात आले. बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपपोलिस आयुक्त तसेच गुन्हे व वाहतूक विभागाचे उपपोलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन झाले. यामध्ये रॅपिड …

Read More »

गणरायाच्या आगमनदिनी आकाशात चंद्र-चांदणीची अनोखी जोडी; बेळगावकरांनी अनुभवला मनमोहक नजारा!

  बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच सोमवारी सायंकाळी बेळगावच्या आकाशात निसर्गाचा मनमोहक अविष्कार पाहायला मिळाला. सायंकाळच्या आकाशात चंद्रकोर आणि चांदणीची सुंदर जोडी एकत्र दिसून आली. गणरायाच्या आगमनाच्या आनंदात या खगोलीय दृश्याने आणखी भर घातली. आकाशातील हे विलोभनीय दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. …

Read More »

घराचे घरपण होतीस तू आई…आमची गृहलक्ष्मी होतीस तू आई…

  तुझे अचानक जाणे आम्हाला पोरके करून गेले… तुझ्या आठवणींचा सुगंध मात्र सदैव आमच्या मनात दरवळत राहील. कै. शांता गुंडू पाटील यांचे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निधनाचा अकरावा दिवस. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली… ‘जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला’ असे म्हणतात. कै. शांता …

Read More »

बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली; आजपासून भक्तिमय पर्वाला प्रारंभ

  तिथी वृद्धीमुळे यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा; हरतालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी बेळगाव : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, सोमवार (दि. १४) पासून भक्ती, उत्साह आणि आनंदाने भारलेल्या गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली असून, बाप्पाच्या आगमनाने …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त १,२६० सीसीटीव्हींच्या नजरकैदेत बेळगाव; १९ चेकपोस्टवर २४ तास तपासणी

  यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना बेळगाव : गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, त्यापैकी २१ मूर्ती नव्याने प्रतिष्ठापित केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

बेळगावात डॉल्बी-डीजे-लेझरवर बंदी; पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन

    आदर्श गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलिसांकडून पुरस्कार बेळगाव : गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव पोलिस विभागाने यंदा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस विभागाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी तीन …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत भक्तांची जत्रा

  सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या; रविवारी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी बेळगाव : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. कल्पकतेला आणि कलाविष्काराला वाव देणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीने घराघरांत लगबग सुरू झाली असून, त्याचे प्रतिबिंब रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये उमटले. गणेशोत्सवासाठी आवश्यक सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या …

Read More »