



महादेव कोळी यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर देण्याची मागणी
खानापूर : राज्यभर सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनाचे लोण आता खानापूर तालुक्यातही पोहोचले आहे. तालुक्यातील पारिश्वाड, बिडी, लिंगनमठ क्रॉस यांसह विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले असून, ऊसदराच्या मागणीसाठी रस्ते रोखून धरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी लिंगनमठ क्रॉस येथील रयत संघटनेच्या आंदोलनस्थळी भेट दिली.
यावेळी महादेव कोळी, सुरेश जाधव भाऊ, साईल सुतार, पांडू पाटील, भैरू पाटील, काशिम भाई, पांडू मिटगार, दत्ता बिडकर, राजू डिसिल्वा आदी उपस्थित होते.
यावेळी महादेव कोळी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली.
राजकीय विचारधारा बाजूला ठेवून खानापूर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ऊसदराच्या न्याय्य मागणीसाठी शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांना आपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta