Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह

Spread the love

 

बेळगाव : गेल्या दहा ते बारा दिवसापासून एका गुन्ह्यात युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व सरचिटणीस मनोहर हुंदरे हे हिंडलगा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीमाभागातील मराठी माणूस आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य निर्मितीचा दिवस तत्कालीन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध दिन काळा दिन म्हणून पाळला जातो. या १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या तोंडावर युवा नेते शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांच्या अटकेने सीमाभागात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.माननीय न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याने अजून त्यांची जामिनावर सुटका झाली नाही.
आपण काळ्या दिनाच्या फेरीत प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने हे दोघेही १ नोव्हेंबर काळ्यादिनी कारागृहात एकदिवशीय अन्नत्याग सत्याग्रह करून सिमावासियांच्या भावना व्यक्त करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *