Friday , November 6 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो -खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड

Spread the love

 

बेळगाव : पदवीपूर्व (प्री.) युनिव्हर्सिटी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या वैष्णवी कोवाडकर, ऐश्वर्या कंग्राळकर, स्नेहा हिरोजी, साक्षी पाटील व प्रेरणा मुतगेकर या पाच खेळाडूंची बेंगलोर येथे होणाऱ्या पदवी पूर्व राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भैरीदेवकोप्प, धारवाड येथे झालेल्या राष्ट्रीय महिला सीनियर खो खो निवड चाचणीमध्ये कर्नाटक संघातून मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या वैष्णवी कोवाडकर, स्नेहा हिरोजी व सरिता पाटील या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातील जालना या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर महिला खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील सर्व खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक शिक्षिका सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील व वैभवी दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *